मुंबई, दि. 15 : सुशिक्षित तरुणांना व्यवसाय करण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत सुधारित बीज भांडवल योजनेअंतर्गत मृदु कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत तरुणांना उद्योग व्यापारासाठी सहा टक्के सरळ व्याजाने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योग विभागाने केले आहे.
या योजनेंतर्गत उत्पादन उद्योगासाठी रूपये 25 लाख इतक्या प्रकल्प खर्च मर्यादेच्या 15 टक्के व जास्तीत जास्त 3.75 लाख एवढे मृदु कर्ज देण्यात येणार आहे. उद्योगाची प्रकल्प खर्च मर्यादा 10 लाखापेक्षा कमी असल्यास सर्वसाधारण लाभार्थ्यास प्रकल्प खर्चाच्या 15 टक्के आणि मागासवर्गीयांना प्रकल्प खर्च मर्यादेच्या 20 टक्के कर्ज देण्यात येते. या कर्जावर वार्षिक 6 टक्के प्रमाणे सरळव्याज आकारण्यात येणार आहे. वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यास व्याजावर 3 टक्के प्रमाणे सूट देण्यात येणार असून थकीत कर्जावर 1 टक्के याप्रमाणे दंडव्याज आकारण्यात येते. ही योजना वाहन व्यवसाय, व्यापार व उद्योगासाठी लागू आहे. या योजनेसाठी कमीतकमी 7 वी पास आवश्यक असून वय18 ते 50 वर्षे, राज्यात 15 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उद्योग सह संचालक (मुंप्रावि) यांचे कार्यालय, औद्योगिक रसायन प्रयोगशाळा इमारत, टाटानगर समोर, डॉ.व्ही.एन.पुरव मार्ग, चुनाभट्टी ( पूर्व), मुंबई.400022 या (दूरध्वनी क्रमांक. 24056199/24055999) ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन उद्योग सह संचालक यांनी केले आहे.

Post a Comment